शाहू महाराजांच्या विशाळगडावरील ‘त्या’ फोटोचं सत्य समोर आलं; खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपटले

शाहू महाराजांच्या विशाळगडावरील ‘त्या’ फोटोचं सत्य समोर आलं; खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपटले

ऐतिहासिक विशाळगड आणि परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत रविवारी समाजकंटकांच्या पूर्वनियोजित हल्ल्यात नुकसान झालेल्या गजापूर-मुसलमानवाडी या गावाला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी भेट देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील घरेदारे उद्ध्वस्त होऊन संसार उघड्यावर पडलेल्या महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.

या भेटीदरम्यानचा शाहू महाराज यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता त्या फोटोमागील सत्य समोर आले असून खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपटले आहेत.

गजापूर-मुसलमानवाडीला भेट दिल्यानंतर शाहू महाराज छत्रपती यांनी येथील मुसलमानांची कान धरून माफी मागितली असा आशय असणारा फोटो सोशल मीडियावर शेअर करून खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता या फोटोमागील सत्य समोर आले आहे. शाहू महाराज छत्रपती यांनी गजापूर-मुसलमानवाडीला भेट दिली तेव्हा महिलांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.

विशाळगडाबाबतच्या आक्षेपार्ह पोस्टवर बंदी; कलम 163 जारी, कोल्हापूर जिह्यात उद्यापर्यंत अंमलबजावणी

यावेळी एका महिलेने माझ्या कानातील दागिने ओढून नेल्याचे शाहू महाराज छत्रपती यांना सांगितले. हीच बाब शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटिल यांना सांगतात. याचा स्पष्ट व्हिडीओही समोर आला आहे. त्यामुळे याच व्हिडीओतील स्क्रिनशॉट वापरून शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत खोटा नॅरेटिव्ह सेट करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणारे मात्र चांगलेच तोंडावर आपटले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;