Breaking – मनोरमा खेडकर यांना अटक; पुणे पोलिसांनी महाडमधून ठोकल्या बेड्या

Breaking – मनोरमा खेडकर यांना अटक; पुणे पोलिसांनी महाडमधून ठोकल्या बेड्या

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस स्थानकामध्ये याची नोंद करून पोलीस त्यांना पुण्याला घेऊन जात आहेत. तिथे त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती मिळतेय.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी रिव्हॉल्व्हर रोखून एका शेतकऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर सदर शेतकऱ्याने खेडकर दाम्प्त्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर व दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यापासून मनोरमा खेडकर या बेपत्ता होत्या. त्या महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना हॉटेलमधून ताब्यात घेतले.

पुणे पोलिसांची नोटीस

दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी मनोरमा यांना नोटीस पाठविली होती. त्यानुसार त्यांचा शस्त्र परवाना रद्द का करू नये, अशा प्रकारची विचारणा केली होती. ‘तुम्ही शस्त्राचा दुरूपयोग करून परवानाविषयक अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असून, 10 दिवसांत लेखी म्हणणे मांडावे, तुम्ही नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कार्यकाही करण्यात येईल.’ अशा आशयाची नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केली होती.

पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा; खोटा पत्ता, बनावट रेशनकार्ड देत मिळवलं अपंगत्व प्रमाणपत्र

काय आहे प्रकरण?

धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला, असे सांगितले जात आहे. मला कायदा सांगू नका, सातबाऱ्यावर माझे नाव आहे, असे त्या शेतकऱ्यांना दरडावून सांगताना दिसत आहेत. तसेच शेतकऱ्यांना ओरडत असताना त्यांनी त्यांच्यावर बंदूक देखील रोखली होती. त्यांचा रिव्हॉल्व्हर रोखून दमबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पूजा खेडकरच्या आईची ‘गुंडागिरी’; शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरने दमदाटी करताना व्हिडीओ व्हायरल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;