धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून देशात दर तासाला दोन तरुण जीवन संपवतात

धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून देशात दर तासाला दोन तरुण जीवन संपवतात

विविध प्रकल्पांतून मोठय़ा प्रमाणावर रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱया एनडीए सरकारला काँग्रेसने आरसा दाखवला आहे. देशातील बेरोजगारीचा दर तब्बल 9.2 टक्क्यांनी वाढला असून बेरोजगारीला पंटाळून देशात दर तासाला दोन आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक सत्य काँग्रेसने एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये अधोरेखित केले आहे. रोजगार मिळत नसल्याने तरुण, तरुणी प्रचंड चिंताग्रस्त आहेत, परंतु मोदींना त्यांचे दुःख दिसत नाही. ते उलटसुलट आकडे पसरवण्यात व्यस्त आहेत. आम्ही रोजगार देण्यात गेल्या 4 ते 5 वर्षांचा विक्रमही मोडला आहे, असे धडधडीत असत्य मोदी उघडपणे मांडत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसने मोदींवर जळजळीत टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान उद्योगांना उद्ध्वस्त केले. रोजगाराच्या संधी संपवल्या. मोदी सरकारच्या धोरणांमुळे तरुण बेरोजगारीच्या दलदलीत ढकलला गेला. परंतु, नरेंद्र मोदी यांना तरुणांना जे भोगावे लागत आहे त्याचे काहीच वाटत नाही, त्यांना काहीच फरक पडत नाही. मोदी आपल्याच दुनियेत मस्त आहेत. आपल्या मित्रांना श्रीमंत बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. नरेंद्र मोदी यांनी तरुणांना बेरोजगार करून देशाला उद्ध्वस्त केले, हेच सत्य आहे. असे टीकास्त्र काँग्रेसने एक्सवरून मोदींवर सोडले आहे.

मेक इन इंडिया आणि स्टार्टअपचा डंका वाजवणारे मोदी सरकार हिंदुस्थानातील तरुणांना रोजगार देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आणि इन्स्टिटयुट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालातून उघड झाले आहे. हिंदुस्थानात तब्बल83 टक्के तरुण बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे.

– किमान माध्यमिक शिक्षण झालेले 35.2 टक्के सुशिक्षित तरुण 2 हजार सालात बेरोजगार होते. त्यात निरंतर वाढ होत गेली आणि 2022 मध्ये हे प्रमाण जवळपास दुप्पट होऊन 65.7 टक्क्यांवर गेल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

83 टक्के तरुण बेरोजगार

– पंतप्रधान नरेंद्र मोदी जे मांडत आहेत ते सत्य नाही. उलट देशात तब्बल 83 टक्के तरुण बेरोजगार आहेत. देशात डझनभर पेपर पह्डले गेले आहेत.
– 30 लाख सरकारी पदे रिक्त असून 20 ते 24 वर्षांच्या तरुणांचा बेरोजगारीचा दर 44.49 टक्के इतका आहे.
– हिंदुस्थानातील तरुणांना नोकऱया मिळवण्यासाठी रशिया आणि इस्रायलला जाणे भाग पडत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;