Katrina Kaif: ‘या’ गावात का होते कतरिना कैफची पूजा? अनेक वर्षांनंतर सत्य समोर

Katrina Kaif: ‘या’ गावात का होते कतरिना कैफची पूजा? अनेक वर्षांनंतर सत्य समोर

अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेक जण कतरिना हिचे चाहते आहेत. सोशल मीडियावर देखील चाहते कतरिना हिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकताच, कतरिना हिने 41 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटींनी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अभिनेत्रीबद्दल एक मोठं सत्य समोर आहे. भारतातील एका गावातील कपल गेल्या 11 वर्षांपासून कतरिना हिची पूजा करत आहेत. शिवाय अभिनेत्रीचा वाढदिवस देखील त्यांनी मोठ्या थाटात साजरा केला.

हरियाणा येथील चरखी दादरी जिल्ह्यातील एक कपल रोज कतरिना हिची पूजा करतात. ढाणी फोगट गावचे रहिवासी करमबीर उर्फ ​​बंटू आणि त्याची पत्नी संतोष, कतरिना कैफची देवी म्हणून पूजा करतात. गेल्या 11 वर्षांपासून हे कपल केक कापून आणि लाडू वाटून कतरिनाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. कतरिना कैफने त्यांना भेटायला यावे, अशी त्यांची इच्छा आहे.

बंटू म्हणाला, ‘मी जेव्हा 13 -14 वर्षांचा होतो तेव्हा पासून कतरिना हिचा वाढदिवस साजरा करतो. लग्नाआधी एकटाच वाढदिवस साजरा करायचो. आता मी आणि पत्नी मिळून वाढदिवस साजरा करतो. कतरिना हिने माझ्या घरी यावं अशी माझी इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, कतरिना कधीतरी आम्हाला भेटण्यासाठी नक्की येई…’

बंटू याची पत्नी संतोष म्हणाली, ‘कतरिना आज 41 वर्षांची झाली आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही मोठ्या थाटात वाढदिवस साजरा केला. माझी हात जोडून विनंती आहे की, कतरिना लवकरच आम्हाला भाटण्यासाठी येईल… गेल्या 11 वर्षांपासून आम्ही रोज अभिनेत्रीची पूजा करतो…’ सध्य सर्वत्र कतरिना हिची चर्चा रंगली आहे.

कतरिना कैफचे सिनेमे आणि संपत्ती

‘नमस्ते लंडन’, ‘वेलकम’, ‘पार्टनर’, ‘रेस’, ‘सिंग इज किंग’, ‘राजनीति’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, आणि ‘एक था टायगर’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत कतरिना हिने स्वतःची ओळख निर्माण केली. आज कतरिना कोट्यवधींची मालकीण आहे.

कतरिना कैफ हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे रिपोर्टनुसार 224 कोटी रुपये आहेत. बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल असलेली कतरिना कैफ आता एका सिनेमासाठी सुमारे 15 ते 20 कोटी रुपये मानधन घेते. फक्त सिनेमाच नाही तर, इतर मार्गांनी देखील अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;