भाजपलाच आता अजित पवार गटाची गरज नाही! RSS शी संबंधित साप्ताहिकातील लेखावर NCP ची प्रतिक्रिया

भाजपलाच आता अजित पवार गटाची गरज नाही! RSS शी संबंधित साप्ताहिकातील लेखावर NCP ची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूक पार पडल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार आणि त्यांच्या गटाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टार्गेट केले जात आहे. आरएसएसशी संबंधित मुखपत्र, साप्ताहिकांमधून लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडले जात आहे. भाजपचे कार्यकर्तेही जाहीरपणे अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी करताना दिसतात. आरएसएसशी संबंधित ‘विवेक’ या साप्ताहिकातूनही अजित पवार गटावर पराभवाचे खापर फोडण्यात आले. यावर अजित पवारांनी मौन बाळगले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो यांनी एएनआयशी बोलताना या विषयावर परखड शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आरएसएसशी संबंधित मुखपत्र किंवा साप्ताहिकामध्ये दुसऱ्यांदा अजित पवार यांच्याविरोधात भाष्य करण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाला आता अजित पवार किंवा त्यांच्या गटाची गरज नाही. भाजप फक्त दुसऱ्यांचा पक्ष आणि कुटुंब फोडतो. त्याद्वारे काही प्रमाणात मतांचा लाभ मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या या राजकारणाला झिडकारले. जनतेनेच खरी शिवसेना आणि खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता हे दाखवून दिले.

अजित पवार यांना सोबत घेऊन फायदा होण्याऐवजी नुकसान झाल्याची उपरती लोकसभेच्या निकालानंतर भाजपला झाली असावी. त्यामुळे भविष्यात त्यांना अशा लोकांना एकत्र घ्यायचे नसेल. पण भाजपच नाही तर अजित पवार गटातील लोकांनाही या गटाबाबत साशंकता वाटत आहे. अजित पवार बारामतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला लीड मिळवून देऊ शकले नाहीत. याचाही विचार भाजपने केलाच असणार, असेही क्रास्टो म्हणाले. बारामतीमध्ये अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात होत्या. तिथे सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित साप्ताहिकातील एका लेखावर, महाराष्ट्रातील भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच्या युतीला देताना, NCP (SCP) नेते आणि नॅशनल स्पोक क्लाइड क्रॅस्टो म्हणतात, “भाजपला अजित पवार जी किंवा त्यांची गरज नाही हे यावरून दिसून येते. काही मतं मिळवण्याच्या नादात भाजपने पक्ष आणि घराणेशाही तोडून दाखवली आहे शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने अजितदादांना घेणं म्हणजे आपलं नुकसानच आहे, हे अजित पवारांच्या छावणीतल्या लोकांनाही कळून चुकलं आहे अजित पवार त्यांच्यापासून दूर आहेत आणि ते अडचणीत असल्याचे कारण शोधत आहेत.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएसच्या ऑर्गनायझर या इंग्रजी मुखपत्रानंतर आता साप्ताहिक विवेकमध्येही अजित पवार यांच्याविरोधात लेख लिहिण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवारांमध्ये नक्की काय सुरू आहे? याबाबत मी ठामपणे काही सांगू शकत नाही. याबाबत ते दोन पक्षच बोलू शकतात, असे त्या म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;