पारूच्या सत्याची सत्वपरीक्षा सुरू; मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर
'पारू' या मालिकेत पारू पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. पण यावेळी ही लग्नगाठ कुठच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी नाही तर प्रत्यक्ष तिच्यासाठी बांधली जाणार आहे. अहिल्यादेवींनी पारू आणि हरीशचं लग्न ठरवलं आहे.
घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. लग्नाचे सगळे कार्यक्रम मारुतीच्या म्हणजेच पारूच्या घरासमोर होणार आहेत. हळद फोडण्याचा कार्यक्रम पारूच्या घरी सुरु होतो आणि तिथे पारू आपल्या पहिल्या लग्नाचं सत्य हरीश समोर उलगडण्याचं ठरवते.
पारूच्या मेहंदीसाठी खास पाहुणेही आले आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून अहिल्या, दिशा आणि दामिनी आहेत. दिशा कार्यक्रमात खोळंबा घालायला जाते. परंतु अहिल्या सर्व संभाळून घेते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List