अनंत – राधिका यांच्या लग्नात झालेला खर्च अंबानी किती दिवसात भरुन काढतील?

अनंत – राधिका यांच्या लग्नात झालेला खर्च अंबानी किती दिवसात भरुन काढतील?

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांचं जगातील महागड्या लग्नापैकी एक लग्न होतं. लहान मुलाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबियांनी हजारो कोटी रुपये खर्च केले. अंबानी कुटुंबाने हॉलिवूड सेलिब्रिटी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती, जागतिक नेते, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, संपूर्ण बॉलिवूड आणि क्रीडा जगताला आमंत्रणं पाठवली आणि त्यांच्या लग्नाला देशाचे पंतप्रधान, बॉलिवूड, हॉलिवूडसह उद्योगपती आणि अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यांच्या स्वागतासाठी आणि सोयीसाठी अंबानी कुटुंबियांनी खास व्यवस्था देखील केली होती.

अंबानी कुटुंबियांनी लहान मुलाचं लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला. संपूर्ण जगाचं लक्ष अनंत – राधिका यांच्या लग्नाकडे होतं. सांगायचं झालं तर, सामान्य व्यक्ती त्यांच्या उत्पन्नातील 5 ते 15 टक्के खर्च लग्नात करतो. तर मुकेश अंबानी यांनी अनंत यांच्या लग्नात त्यांच्या नेटवर्थमधील फक्त 0.5 टक्के पैसे खर्च केले आहेत. अशात अशा प्रश्न उपस्थित राहातो की, मुकेश अंबानी यांनी नक्की किती खर्च केला आहे.

अनंत अंबानी यांच्या लग्नात किती झाला खर्च?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात मुकेश अंबानी यांनी कोणतीच कमी ठेवली नाही. लग्नात प्रत्येक गोष्ट होती, ज्याची सामान्य व्यक्ती फक्त कल्पनाच करु शकतो. एनसी फायनान्शियल ॲडव्हायझरी सर्व्हिसचे संस्थापक नितीन चौधरी यांनी एका विश्लेषणाच्या आधारे ही माहिती दिली.
नितीन चौधरी यांच्यानुसार, अंबानी कुटुंबियांनी त्यांच्या नेटवर्थमधील फक्त 0.5 टक्के पैसे खर्च केले आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्याकडे 123.2 अबर डॉलर एवढी संपत्ती आहे. तर अनंत – राधिका यांच्या लग्नाचा खर्च फक्त 5 हजार कोटी रुपये झाला आहे.

खर्च झालेला पैसा किती दिवसांत भरुन काढतील अनंत अंबानी?

मुकेश अंबानी यांच्याकडे रिलायन्स, जिओ सारख्या अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळते. त्यांची संपत्ती पाहाता मुकेश अंबानी एका दिवसात 2,345 कोटी रुपयांहून अधिक कमावतात. अशाक अनंत अंबानी यांच्या लग्नातील खर्च मुकेश अंबाना एक – दोन दिवसांत भरुन काढतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;