पेपर चोरणाऱ्या दोघांना सीबीआयकडून अटक; एनटीएच्या ट्रंकमधून केली होती चोरी

पेपर चोरणाऱ्या दोघांना सीबीआयकडून अटक; एनटीएच्या ट्रंकमधून केली होती चोरी

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने आज नीट यूजी परीक्षेतील पेपर चोरणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांनी  एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ट्रंकमधून हे पेपर चोरल्याचे उघड झाले आहे. पंकज कुमार आणि राजू सिंग अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे पंकज कुमार सिव्हिल इंजिनीयर आहे.

नीट पेपरफुटी आणि अनियमिततेप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. परीक्षेतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या तपास संस्थेने सहा एफआयआर नोंदवले आहेत. बिहारमधील एफआयआर पेपर लीकशी संबंधित आहेत तर उर्वरित गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची तोतयागिरी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत. राजू सिंग या दुसऱ्या आरोपीने पेपर चोरण्यात आणि टोळीच्या इतर सदस्यांना पाठवण्यात मदत केली होती. सिंह यालाही हजारीबाग येथून अटक करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;