मास्टर लिस्टच्या विजेत्यांची प्रतीक्षा संपणार; म्हाडातर्फे लवकरच देकारपत्र
गेल्या सहा महिन्यांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या मास्टर लिस्टमधील विजेत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. विजेत्यांच्या पात्रता पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात असून म्हाडातर्फे विजेत्यांना लवकरच देकारपत्र पाठविण्यात येणार आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱया रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने 28 डिसेंबरला मास्टर लिस्टवरील 265 भाडेकरू आणि रहिवाशांची पहिल्यांदाच संगणकीय सोडत काढली. काही अर्जदारांनी खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याची तक्रार म्हाडाला प्राप्त झाली होती. त्यामुळे सोडतीमधील सर्वच विजेत्यांची पुन्हा पात्रता पडताळणी करण्याचा निर्णय म्हाडाच्या उपाध्यक्षांनी घेतला. त्यामुळे सहा महिने झाले तरी विजेते वेटिंगवरच आहेत. पात्रता पडताळणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून 265पैकी 212 विजेत्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. लवकरच विजेत्यांना देकारपत्र पाठविण्यात येतील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List