साईभक्ताकडून 11 किलो चांदीचे दोन दंड अर्पण
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. एका साईभक्ताने साईचरणी अंदाजे 9 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 11 किलो चांदीचे 2 दंड अर्पण केले आहेत. या दंडांचा श्रींचे आरतीवेळी ललकारीसाठी वापर करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. हे दंड अतिशय सुंदर असून दानशुर साई भक्ताने संस्थानला आपल नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे. 11 किलो चांदीचे 2 दंड श्री साईबाबा संस्थानला देणगीस्वरुपात दिल्यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List