शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 400 रुपये लाच मागितली, लाचखोर अटकेत
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 400 रुपये लाच मागणारा लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. तक्रारदार यांची बहीण ही इयत्ता अकरावी व बारावी शिक्षणासाठी सन 2012-13 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर मध्ये शिक्षण घेत होती. सन 2013 मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर तेव्हापासून ती मौजे मालेवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथे सासरी राहण्यास आहे. शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी जयप्रकाश बालाजी बिराजदार, (वय 45 वर्षे,) पद प्रयोगशाळा सहायक, वर्ग-3, नेमणूक पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर, जि.लातूर, रा.विकास नगर, देगलूर रोड, उदगीर ता.उदगीर यांनी 8 जुलै रोजी शाळेतील कार्यालयात दिला होता. 12 जुलै रोजी शाळेत जाऊन त्यांचे बहिणीचा शाळा सोडल्याचा दाखला कधी मिळेल असे विचारले असता जयप्रकाश बिराजदार यांनी 400 रुपये घेऊन या व दाखला घेऊन जा असे सांगितल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या बहिणीचे संमतीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली. दि. 16 जुलै रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक जयप्रकाश बिराजदार यांनी तक्रारदार यांच्याकडे 400/- रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर, जि.लातूर येथील कार्यालयात शासकीय पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह रांगेहात पकडले. देवणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List