सैफचा लेक इब्राहिम अली खान याने ओढले ‘या’ अरबपती गायकाचे जॅकेट, लोकांनी सुनावले खडेबोल, नवाब असूनही…

सैफचा लेक इब्राहिम अली खान याने ओढले ‘या’ अरबपती गायकाचे जॅकेट, लोकांनी सुनावले खडेबोल, नवाब असूनही…

12 जुलै 2024 रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न झाले. आता या लग्नानंतर विविध फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार या लग्नात धमाल करताना दिसले. अनिल कपूरही अनंत अंबानीच्या वरातीमध्ये डान्स करत होते. हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांचेही डान्सचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. या लग्नात फक्त देशच नाहीतर विदेशातूनही लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगप्रसिद्ध अनेक स्टारचे शो देखील या लग्नात झाले. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

सिगिंग सेंसेशन आणि Baby calm down गाण्याने फेमस रेमा हा देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दाखल झाला होता. लग्नात तो परफॉर्म करताना देखील दिसला. यावेळी त्याच्या गाण्यावर सर्वजण धमाकेदार डान्स करताना दिसले. यावेळी रेमाच्या गाण्यावर डान्स करताना सैफ अली खान याचा लेक इब्राहिम अली खान हा देखील दिसला.

विशेष म्हणजे इब्राहिम अली खान हा स्टेजच्या अत्यंत जवळ उभा होता. यावेळी मस्त गाणे म्हणताना स्टेजवर रेमा हा दिसतोय. मात्र, यावेळी असे काही घडले की, लोक इब्राहिम अली खान याला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. रेमा हा परफॉर्म करताना त्याचे जॅकेट काढत होता. मात्र, यावेळी चक्क ते जॅकेट ओढताना इब्राहिम अली खान हा दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रेमाने पूर्णपणे त्याचे जॅकेट काढलेही नाही तोपर्यंत त्याचे जॅकेट इब्राहिम अली खान हा ओढत होता. हेच नाहीतर पुढे रेमाला जॅकेट मागताना देखील इब्राहिम अली खान हा दिसतोय. मात्र, रेमा हा इब्राहिम अली खान याला आपले जॅकेट देत नाही. तो शिखर पहाडिया याच्याकडे ठेवण्यासाठी आपले जॅकेट देतो, हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर लोक हे इब्राहिम अली खानला सुनावत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, नवाब होऊनही तू असे कसे करू शकतो. दुसऱ्या लिहिले की, अरे बाबा तू इतक्या मोठ्या संपत्तीचा मालक आहेस आणि असे जॅकेट कसे मागू शकतो. तिसऱ्या लिहिले की, या इब्राहिमकडे जॅकेट नाहीत का?  रेमाचे जॅकेट का मागत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;