Katrina Kaif: 1 पोस्टसाठी 1 कोटी, सिनेमा जाहिरातींसाठी कतरिना घेते कोट्यवधी, संपत्तीचा आकडा थक्क करणारा…

Katrina Kaif: 1 पोस्टसाठी 1 कोटी, सिनेमा जाहिरातींसाठी कतरिना घेते कोट्यवधी, संपत्तीचा आकडा थक्क करणारा…

अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. कतरिना हिने करियची सुरुवात केली तेव्हा अभिनेत्रीचे अनेक सिनेमे फ्लॉप ठरले. पण अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. अनेक हीट सिनेमे अभिनेत्रीने बॉलिवूडला दिले आणि बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं. ‘नमस्ते लंडन’, ‘वेलकम’, ‘पार्टनर’, ‘रेस’, ‘सिंग इज किंग’, ‘राजनीति’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, आणि ‘एक था टायगर’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत कतरिना हिने स्वतःची ओळख निर्माण केली. आज कतरिना कोट्यवधींची मालकीण आहे.

बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल असलेली कतरिना कैफ आता एका सिनेमासाठी सुमारे 15 ते 20 कोटी रुपये मानधन घेते. मात्र, कॅटच्या कमाईचा स्रोत केवळ सिनेमाच नाही तर इतरही अनेक गोष्टी आहेत. कतरिना कैफची सोशल मीडियावर खूप तगडी फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचे 8.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

रिपोर्टनुसार, कतरीना एक सोशल मीडियापोस्ट करण्यासाठी कंपनीकडून जवळपास 1 कोटी रुपये घेते. शिवाय आणखी एका रिपोर्टनुसार, एका जाहिरातीसाठी अभिनेत्री 6 कोटी रुपये घेते. कोणत्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी अभिनेत्री 3.5 कोटी रुपयांचं मानधन घेते. कतरीनाने 2019 मध्ये एक कॉस्मेटिक ब्रँड देखील लँच केला आहे. तिच्या कॉस्मेटिक ब्रँडचं नाव ‘के ब्यूटी’ आहे.

कतरिना कैफ हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे रिपोर्टनुसार 224 कोटी रुपये आहेत. आज कतरीना हिच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. अभिनेत्री मुंबई एका आलिशान घरात राहाते. शिवाय अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.

कतरिना हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता विकी कौशल याला अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर देखील दोघे एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतात. चाहत्यांना देखील विकी आणि कतरिना यांची जोडी प्रचंड आवडते.

सांगायचं झालं तर, कतरिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर कतरिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र कतरिना हिची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;