रणबीर कपूर आजही ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याच्या संपर्कात, अभिनेत्याच्या कुटुंबासोबत…

रणबीर कपूर आजही ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याच्या संपर्कात, अभिनेत्याच्या कुटुंबासोबत…

अभिनेता रणबीर कपूर याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. रणबीर याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय अनेक देशांमधील खास व्यक्तींसोबत रणबीर याच्या ओळखी देखील आहे. आता पाकिस्तानच्या एका अभिनेत्यासोबत असलेली रणबीर याची ओळख चर्चेत आली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे. आज फवाद बॉलिवूडपासून दूर आहे, पण काही सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं होतं. आजही फवाद बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या संपर्कात आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत फवाद खान याने ‘ऐ दिल है मुश्किल’ फेम अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. रणबीर कपूर याच्यासोबत चांगले संबंध आहेत, कारण आम्ही दोघांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. शिवाय कपूर कुटुंबाबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं.

रणबीर कपूर याच्याबद्दल फवाद याला प्रश्न विचारण्यात आला यावर अभिनेता म्हणाला, ‘कधी-कधी आमचं बोलणं होतं. कधी फोनवर तर कधी चॅटवर आमचं बोलणं होतं. त्यामुळे मी रणबीरच्या संपर्कात आहे. शिवाय कपूर कुटुंबियांसोबत देखील चांगले संबंध आहेत…’ असं देखील अभिनेता फवाद म्हणाला.

फक्त रणबीर कपूर नाही तर, अन्य बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत देखील फवाद संपर्कात आहे. ‘करण जोहर आणि शकुन बत्रा यांच्याकडून देखील प्रेम आणि सन्मान मिळतो. त्यामुळे आमच्यामध्ये मैत्रीसंबंध आहेत. काही निर्माते देखील चांगले मित्र आहेत. कधी भेटण्याचा प्लान झाला तर, आम्ही भेटतो आणि बोलतो… आम्ही आजही एकमेकांच्या संपर्कात आहोत…’ असं देखील अभिनेता फवाद खान म्हणाला.

फवाद खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने ‘खूबसूरत’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात फवाद याच्यासोबत अभिनेत्री सोनम कपूर होती. त्यानंतर फवाद याने शकुन बत्रा दिग्दर्शित ‘कपूर एन्ड सन्स’ सिनेमात एकत्र काम केलं. सिनेतात फवाद याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, ऋषी कपूर, रजत कपूर आणि रत्ना पाठक शाह यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

फवाद खान याला ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमातून अधिक लोकप्रियता मिळली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील हीट ठरला. सिनेमात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते. तर फवाद याने अनुष्का हिच्या पतीची भूमिका साकारली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;