Munjya: कोणत्या ओटीटीवर पाहता येईल ‘मुंज्या’? दिग्दर्शक आदित्य सरपोतदारची माहिती

Munjya: कोणत्या ओटीटीवर पाहता येईल ‘मुंज्या’? दिग्दर्शक आदित्य सरपोतदारची माहिती

‘स्त्री’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या यशानंतर त्याच निर्मात्यांनी गेल्या महिन्यात ‘मुंज्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. 7 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं प्रमोशन फार काही झालंच नव्हतं. तरीसुद्धा केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. आदित्य सरपोतदार या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘मुंज्या’चं दिग्दर्शन केलं. चित्रपटाची कथा ही कोकणाशी संबंधित असल्याने त्यात बरेच मराठी कलाकार पहायला मिळाले. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अनेकांना प्रतीक्षा आहे.

‘मुंज्या’ हा चित्रपट अजूनही काही थिएटर्समध्ये सुरू आहे. मात्र त्याचे शोज फार नाहीत. त्यामुळे हा चित्रपट आता ओटीटीवर कधी पहायला मिळेल, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने ओटीटी रिलीजविषयी माहिती दिली. ऑगस्टनंतर हा चित्रपट ओटीटीवर पाहता येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. “एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांनी तो ओटीटीवर येतो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हा नियम पाळला जातो. त्यामुळे डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला लवकरच मुंज्या पाहता येईल”, असं ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)

आदित्य सरपोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मुंज्या’ हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. या तारखेची घोषणा लवकरच निर्मात्यांकडून केली जाईल. ‘मुंज्या’ या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग हे कोकणात झालंय. तिथला समुद्रकिनारा, कोकणातील गाव हे सर्व या चित्रपटात पहायला मिळतं. अवघ्या 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघसुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

‘मुंज्या’ या चित्रपटात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग, सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात शर्वरीचा आयटम साँग असून त्याला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. शर्वरीच्या करिअरमधील हा उल्लेखनीय चित्रपट ठरला. आश्चर्याची बाब म्हणजे ‘मुंज्या’ प्रदर्शित होण्याआधी त्याची काहीच चर्चा नव्हती. मात्र प्रदर्शनानंतर ‘माऊथ पब्लिसिटी’चा त्याला मोठा फायदा झाला. सोशल मीडियावर त्याची इतकी चर्चा झाली की थिएटरकडे अधिकाधिक प्रेक्षकवर्ग आपसूकच आकर्षित झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;