शेतकरी संघर्ष समितीचे अकोलेत आंदोलन, दूधहंडी फोडून सरकारचा निषेध
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज अकोले तालुक्यातील कोतूळ येथे दूधदर प्रश्नासंदर्भामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी सामील झाले होते. यावेळी दूधहंडी फोडून सरकारचा निषेध करण्यात आला. डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतूळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज कोतूळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. कोतूळ येथील खटपट नाका चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या मंडपासमोर दूधहंडी फोडून सरकारचा निषेध करण्यात आला.
दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 15 जुलै ते 21 जुलै राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. आज पहिल्याच दिवशी दूधहंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली.
आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बी. जे. देशमुख, सीताराम देशमुख, राजू देशमुख, बाळासाहेब गीते, विजय वाकचौरे, राजेंद्र गवांदे, गौतम रोकडे, नीलेश तळेकर, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव यांनी सहभाग घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List