पूरस्थिती रोखण्यात सरकार असमर्थ; आता देवालाच आदेश द्यायचे का? उच्च न्यायालयाचा खरमरीत सवाल

पूरस्थिती रोखण्यात सरकार असमर्थ; आता देवालाच आदेश द्यायचे का? उच्च न्यायालयाचा खरमरीत सवाल

मुसळधार पावसाने राज्याच्या ग्रामीण भागाला झोडपल्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक पावसाळय़ात उद्भवणारी ही स्थिती रोखण्यात सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने सोमवारी नाराजीचा सूर आळवला. ‘आता देवालाच आदेश द्यायचा का’, असा खरमरीत सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

सांगली, कोल्हापूर जिह्यांत प्रत्येक पावसाळय़ात पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला निर्देश द्या, अशी मागणी करीत सुशांत पाटील यांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. त्यावर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या ढिम्म कारभाराकडे लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची खंडपीठाने गंभीर दखल घेतली आणि राज्य व केंद्र सरकारची असमर्थता तसेच सुस्त प्रशासकीय यंत्रणांवर तीव्र नाराजीचा सूर आळवला. याचवेळी ‘आता देवालाच आदेश द्यायचा का?’ असा खरमरीत सवाल करीत न्यायालयाने याचिका निकाली काढली.

याचिकाकर्त्याचा दावा 

सांगली, कोल्हापूर जिह्यांत गेल्या काही वर्षांत प्रत्येक पावसाळय़ात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक कुटुंबांचे संसार पाण्याखाली जाऊन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. यामध्ये होणाऱ्या जीवित व वित्तहानीचा सरकारने गांभीर्याने विचार केलेला नाही. पूर परिस्थिती रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा दावा याचिकेतून करण्यात आला.

मुख्य सचिवांकडे दाद मागण्यास मुभा 

पूरस्थिती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याने  राज्याच्या मुख्य सचिवांकडे तसे निवेदन द्यावे, त्या निवेदनावर मुख्य सचिव योग्य तो निर्णय घेतील, असे न्यायालयाने याचिका निकाली काढताना स्पष्ट केले. 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;