बा विठ्ठला, राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना दे! नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे

बा विठ्ठला, राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना दे! नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा, असे साकडे त्यांनी विठ्ठलाला घातले. तसेच राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली.

विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडीत पायी चालताना पटोलेंनी वारकऱ्यांसह पाऊल खेळण्याचा आनंद घेतला. नाना पटोले यांनी मंगळवेढा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा माउली तुकाराम आणि ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात सभोवतालचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. परंपरेनुसार नाना पटोले दरवर्षी पालख्यांचे आगमन झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात जाऊन पालख्यांचे दर्शन घेतात व वारकऱ्यांबरोबर विठुमाऊलीच्या भक्तीत रमतात.

सोलापूरवरून पंढरपूरकडे जात असताना पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे ग्रामस्थांकडून नाना पटोले यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेचे अध्यक्ष चेतन नरुटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, विजय हत्तुरे, सुरेश हसापुरे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;