दूध हंडी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ बंद ठेवत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी

दूध हंडी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ बंद ठेवत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी

दुध प्रश्नाबाबत अकोले तालुक्यामध्ये सोमवारी डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. बाजारपेठ बंद ठेवून अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी सोमवारी कोतुळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र आले होते. आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन यावेळी करण्यात आले. वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला. अभंग व भजनाच्या जयघोषात मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. दूध हंडी फोडण्याच्या अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत या आंदोलनात सहभाग घेतला. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 15 जुलै ते 21 जुलै राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी दूध हंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली असून महाराष्ट्रभर विविध पद्धतीने हे आंदोलन केले जाणार आहे.

आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख,अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बी.जे. देशमुख, सिताराम देशमुख, राजू देशमुख, बाळासाहेब गीते, विजय वाकचौरे, राजेंद्र गवांदे, गौतम रोकडे, निलेश तळेकर, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव यांनी सहभाग घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;