विकी कौशल लवकरच बनणार बाबा? कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर दिली प्रतिक्रिया

विकी कौशल लवकरच बनणार बाबा? कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर दिली प्रतिक्रिया

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या जोरदार चर्चा आहेत. विकी कौशल आणि कतरिना लवकरच आई-बाबा बनणार असल्याचं म्हटलं जात होतं. यादरम्यान दोघांचा लंडनमधील एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. नुकतेच हे दोघं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळीही कतरिनाचा बेबी बंप दिसल्याच्या चर्चा होत्या. या सर्व चर्चांवर अखेर विकी कौशलने मौन सोडलं आहे. दिल्लीमध्ये त्याच्या आगामी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला कतरिनाच्या प्रेग्नंसीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना विकी म्हणाला, “गुड न्यूजबद्दल बोलायचं झाल्यास, ती तुमच्यासोबत शेअर करण्यात आम्हाला खूपच आनंद होईल. पण सध्या त्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. सध्या तुम्ही बॅड न्यूज एंजॉय करा, जेव्हा गुड न्यूज येईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू.”

कतरिनाचा येत्या 16 जुलै रोजी वाढदिवस आहे. याविषयी त्याने पुढे सांगितलं, “तो खास दिवस आहे. मी तिच्यासोबत मिळून हा वाढदिवस साजरा करेन. आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मी प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तीसुद्धा विविध ठिकाणी प्रवास करतेय. त्यामुळे आम्हाला एकमेकांसोबत पुरेसा वेळच मिळाला नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

याआधी ‘जीक्यू’ला दिलेल्या मुलाखतीत विकी लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला होता. “लग्नानंतर तुम्ही पहिल्यासारखे राहतच नाही. एका व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचा वेगळाच आनंद असतो. लग्नानंतर तुम्हाला दोघांना एकमेकांविषयी विचार करावा लागतो. प्रत्येक निर्णय एकमेकांचा विचार करून घ्यावा लागतो. तेव्हाच मानसिक शांती टिकून राहते. मी माझ्या 33 वर्षांच्या आयुष्यात जितका समजूतदार नव्हतो, तितका मी गेल्या दोन वर्षांत बनलोय, असं मी ठामपणे म्हणू शकतो”, असं विकी म्हणाला.

कतरिना गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये तिच्या कुटुंबीयांसोबत राहत होती. मे महिन्यात कतरिना आणि विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन रस्ता ओलांडताना दिसले. जेव्हा कतरिनाला समजलं की त्यांचा कोणीतरी व्हिडीओ काढत आहे, तेव्हा ती विकीचा हात मागे खेचते. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;