अनंत-राधिकाच्या लग्नामुळे ‘ही’ 11 वर्षांची स्टारकिड आली प्रकाशझोतात; कोण आहे ती?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नसोहळ्याला देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये एका 11 वर्षांच्या स्टारकिडने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या स्टारकिडने किम कार्दशियनपासून रणवीर सिंहपर्यंत अनेकांसोबत फोटो क्लिक केले आहेत.
ही स्टारकिड दुसरी-तिसरी कोणी नसून दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांची मुलगी सितारा आहे. वडील महेश बाबू आणि आई नम्रता शिरोडकर यांच्यासोबत ती अंबानींच्या लग्नसोहळ्याला पोहोचली होती.
सिताराने अंबानींच्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींची भेट घेतली. त्यांच्यासोबत तिने सेल्फीसुद्धा क्लिक केले. यातील एका फोटोमध्ये ती बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनाससोबत दिसून आली.
याशिवाय तिने ऐश्वर्या राय बच्चनसोबतही फोटो क्लिक केला. या फोटोमध्ये ऐश्वर्याची मुलगी आराध्या आणि सिताराची आई नम्रतासुद्धा दिसत आहेत.
इतकंच नव्हे तर दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्यासोबतही तिने फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रेखा यांनी सिताराला मिठी मारली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.







Comment List