चंद्रपुरात सशस्त्र दरोडेखोरांची टोळी सक्रिय; घटना सीसीटीव्हीत कैद

चंद्रपुरात सशस्त्र दरोडेखोरांची टोळी सक्रिय; घटना सीसीटीव्हीत कैद

चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली परिसरातील यशवंत नगर येथे रात्रीच्यावेळेस चार दरोडेखोर हातात लाठी काटे घेवून चोरी करण्याच्या बेताने आले होते. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्या चारही जणांनी एका घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु घराच्या बाहेर लाईट सुरू असल्याने दारातूनच परतून गेले. तसेच त्यांनी दुचाकी चोरण्याचं प्रयत्न केला परंतु तिथे मोठा आवाज झाल्याने हा देखील प्रयत्न फसला आणि त्यांनी तेथून पळ काढला. मात्र ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.a

जिल्ह्यात सध्या गुन्हेगारांवर पोलिसांची वचक राहिली नाही. अशी प्रकरणे सतत घडत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर पडोली परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पडोली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे. तसेच परिसरात नागरिकांनी पोलिसग्रस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;