‘बिग बॉस ओटीटी 3’मधून या स्पर्धेकाचा पत्ता कट, घरात मोठ्या घडामोडी सुरू, अखेर…

‘बिग बॉस ओटीटी 3’मधून या स्पर्धेकाचा पत्ता कट, घरात मोठ्या घडामोडी सुरू, अखेर…

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये मोठा धमाका होताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी 3 हे सीजन चांगलेच चर्चेत आहे. नुकताच बिग बॉस ओटीटी 3 मध्ये विकेंडचा वार झाला. या विकेंडच्या वारमध्ये अनिल कपूर यांनी घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावल्याचे बघायला मिळाले. यावेळी बिग बॉसच्या मंचावर विशाल पांडे याचे आई वडिल पोहोचले होते. अरमान मलिक याला चांगलेच खडेबोल सुनावताना विशाल पांडेचे आई वडिल दिसले. ते म्हणाले की, आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. तुम्ही 20 दिवसांमध्ये काय ओळखले तो कसा आहे आणि काय आहे?

मुळात म्हणजे बिग बॉसच्या घरात अरमान मलिक याच्या पत्नीबद्दल अत्यंत चुकीची आणि हैराण करणारी कमेंट ही विशाल पांडे याने केली होती. भाभी मुझे अच्छी लगती है असेच थेट विशालने म्हटले होते. पायल मलिक हिने याबद्दल खुलासा केला होता. विशाल पांडे याचे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाले. त्यानंतर रागात अरमान मलिकने त्याच्या कानाखाली मारली होती.

तो वाद टोकाला गेल्याचे बघायला मिळाले. हेच नाहीतर यानंतर घरात काही ग्रुपही बघायला मिळाले. विकेंडच्या वारमध्ये अनिल कपूर हे आपला मोर्चा थेट चंद्रिका दीक्षित अर्थात वडापाव गर्लकडे वळवतात. वडापाव गर्लला खडेबोल सुनावताना अनिल कपूर हे दिसले. हेच नाहीतर चंद्रिकाचा स्वत:चा कोणताच मुद्दा नसल्याने ती दुसऱ्यांच्या मुद्दात पडत असल्याचे त्यांनी म्हटले.

चंद्रिका दीक्षित हीच आता बिग बॉसच्या घरातून बेघर झाल्याचे बघायला मिळतंय. चंद्रिका दीक्षितला कमी मत मिळाल्याने ती बेघर झालीये. चंद्रिका दीक्षित ही घरात मोठे वाद करताना देखील दिसली. मात्र, प्रेक्षकांना चंद्रिका दीक्षित हिचा गेम आवडला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. चंद्रिका दीक्षित बिग बॉसमधून बाहेर पडताना भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले.

अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झाला होता. मात्र, पायल मलिक ही बेघर झाली. बाहेरून अरमान आणि कृतिकाला मदत करताना पायल दिसत आहे. पायल मलिक ही अरमान मलिकची पहिली पत्नी आहे तर कृतिका मलिक ही अरमानची दुसरी पत्नी आहे. सोशल मीडियावर अरमान मलिक, पायल आणि कृतिका  यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;