मिर्झापूर 3: कुठे आहे कालीन भैय्याची कोठी, त्रिपाठी चौक? या शहरांमध्ये झाली शूटिंग

मिर्झापूर 3: कुठे आहे कालीन भैय्याची कोठी, त्रिपाठी चौक? या शहरांमध्ये झाली शूटिंग

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बऱ्याच प्रतीक्षेनंतर ‘मिर्झापूर 3’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. राजकीय डावपेच, विश्वासघात, अपराध, हिंसा, सूड यांनी भरलेल्या ‘मिर्झापूर 3’ला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. मात्र सोशल मीडियावर याची बरीच चर्चा आहे. 10 एपिसोड्सच्या या सीरिजचं शूटिंग कुठे पार पडलं, हे तुम्हाला माहित आहे का? ‘मिर्झापूर’ या सीरिजचं शूटिंग उत्तरप्रदेशमधील लखनऊ, गोरखपूर, वाराणसी यांसारख्या शहरांमध्ये करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जौनपूर, आजमगढ आणि गाझीपूर यांसारख्या छोट्या शहरांनीही ‘मिर्झापूर’ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘मिर्झापूर 3’ची शूटिंग कुठे झाली?

‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचं नाव उत्तर प्रदेशातील शहरावरून देण्यात आलं आहे. या सीरिजमधील बहुतांश सीन्स हे मिर्झापूरच्या लोकेशनवरच चित्रित झाले आहेत. हे शहर प्रयागराजच्या जवळ आहे. ‘मिर्झापूर 2’मधील काही सीन्स पाहिले तर ही गोष्ट लगेच लक्षात येते. उदाहरण द्यायचं झाल्यास, एका सीनमध्ये पंकज त्रिपाठी यांची व्यक्तीरेखा कालीन भैय्याचा कुलभूषण खरबंदा म्हणजेच बाऊजी अंत्यसंस्कार करतात. चुनारमधील मिर्झापूरजवळील जरगो धरणावर याचं शूटिंग झालंय. दुसऱ्या सीनमध्ये गुड्डू (अली फजल) आणि गोलू (श्वेता त्रिपाठी) हे मुन्नावर (दिव्येंदु) गोळी झाडतात. हा सीनसुद्धा तिथेच चित्रीत झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mirzapur Amazon (@yehhaimirzapur)

‘मिर्झापूर 3’ची कोठी कुठे आहे?

मिर्झापूरमधील त्रिपाठी कोठी आणि कालीन भैय्याची हवेली हे वाराणसीमधील अजमतगढ पॅलेस आहेत. जे मोती झील पॅलेस या नावानेही ओळखलं जातं. सीरिजसाठी ही जागा सर्वांत महत्त्वाची आहे, कारण हवेलीचे सर्व सीन त्यात शूट करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, त्रिपाठी चौकचं शूटिंग रामनगर किल्ल्यावर पार पडलं. ही जागा सीरिजमध्ये अनेकदा दाखवण्यात आली आहे. वाराणसीचे घाटसुद्धा मिर्झापूरमध्ये ठळकपणे झळकले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mirzapur Amazon (@yehhaimirzapur)

लखनऊ, गोरखपूरमध्येही शूटिंग

लखनऊ हे ‘नवाबाचं शहर’ म्हणून ओळखलं जातं. वास्तुकला, स्वादिष्ट मुघलाई खाद्यपदार्थ आणि चिकनकारीच्या कामासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या सिझनमध्ये लालबागमधील नॉव्हेल्टी एमजीएम सिनेमाजवळ क्रॉसिंग पाहू शकता. जिथे गुड्डू शहरातील त्याच्या बहिणीला भेटायला जातो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;