घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या राय निघाली विदेशात, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, लेक आराध्याला घेऊन…
ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय हिने सलमान खान याला डेट केले आहे. मात्र, त्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय हिने अभिषेकचे घर सोडल्याचाही चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र, यावर कोणीही भाष्य केले नाहीये. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली. ऐश्वर्या राय हिचे लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.
आता अनंत अंबानी याच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही थेट मुंबई एअरपोर्टवर पोहोचली. ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली. विशेष म्हणजे यावेळी जबरदस्त लूकमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या या दिसल्या. आराध्या बच्चन ही पापाराझी यांच्याकडे पाहून स्माईल देताना देखील दिसली.
ऐश्वर्या राय ही आपल्या मुलीसोबत विदेशात गेल्याचे सांगितले जातंय. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत फिरताना दिसत आहे. दुसरीकडे अभिषेक बच्चन यांच्यासोबत नसतो. काही दिवसांपूर्वीही ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन हिच्यासोबतच विदेशात जाताना स्पॉट झाली.
अंबानींच्या फंक्शननंतर लगेचच ऐश्वर्या राय ही विदेशात गेलीये. आता ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहे. घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ऐश्वर्या ही मुलीसोबत विदेशात केल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List