ब्रिटीशांच्या रौलट ॲक्टच्या धर्तीवर मिंधे सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत, जंयत पाटील यांची टीका

ब्रिटीशांच्या रौलट ॲक्टच्या धर्तीवर मिंधे सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत, जंयत पाटील यांची टीका

मिंधे सरकार महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ आणणार असल्याचे समजते. ‘हा कायदा म्हणजे ब्रिटीशांच्या सरकारमधील रौलट अॅक्ट’ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरवरून एक ट्विट करत हा कायदा घटनाविरोधी असून सर्व विरोधी पक्षाचा त्याला विरोध असल्याचे सांगितले आहे.

”ब्रिटीश सरकारच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील रैालट ॲक्टच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस पवार सरकार ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ अध्यादेशाद्वारे आणणार असल्याचे समजते. कोणताही कायदा तयार केला जात असताना त्यावर विधी आयोगाकडून मत घेणे, जनतेकडून व तज्ञांकडून अभिप्राय घेणे आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यावर सखोल चर्चा होणे अशी प्रक्रिया असताना सरकार कोणालाही न जुमानता हा पाशवी कायदा अध्यादेशाद्वारे आणत आहे. या कायद्याने पोलिसांना अमर्यादित अधिकार दिले जाणार असून कोणतीही कारणे उघड न करता एखाद्या संघटनेला ‘बेकायदेशीर’ म्हणून घोषित करण्याचे अधिकार शासनाला यातून प्राप्त होणार आहेत. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली या राज्यातील पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा स्पष्ट उद्देश यातून दिसत आहे. हे विधेयक घटनेच्या कलम 21 चे उल्लंघन करणारे घटनाविरोधी विधेयक असून सर्व विरोधी पक्षांचा या विधेयकाला पूर्णपणे विरोध आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;