पंढरपूर वारीसाठी सातारा विभागातून 215 जादा बसेस; 21 जुलैपर्यंत सेवा सुरू राहणार – रोहन पलंगे

पंढरपूर वारीसाठी सातारा विभागातून 215 जादा बसेस; 21 जुलैपर्यंत सेवा सुरू राहणार – रोहन पलंगे

पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. 21 जुलैअखेर सातारा विभागातील सर्व 11 आगारांतून 215 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या जादा बससेवेचा लाभ वारकऱयांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी केले आहे.

पंढरपूरचा यात्रा कालावधी दि 13 ते 21 जुलै असा आहे. बुधवार, दि. 17 जुलै रोजी आषाढी एकादशी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सातारा जिह्यातून मोठय़ा प्रमाणात वारकरी भाविक पंढरपूर येथे जात असतात. त्यामुळे सातारा विभागातून सातारा 25, कराड 20, कोरेगाव 25, फलटण 30, वाई 15, पाटण 15, दहिवडी 20, महाबळेश्वर 8, मेढा 20, पारगाव खंडाळा 12, वडूज 20 अशा मिळून 215 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मार्ग तपासणी पथकामार्फत बसेसची फलटण, बरड, मानेवाडी, मायणी, म्हसवड येथील तपासणी करण्यात येणार आहे.

पुणे प्रदेशच्या वाहतुकीसाठी यात्रा प्रमुख म्हणून चंद्रभागा बसस्थानक येथे विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, कैलास पाटील, रमेश बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेसाठी कुलदीप डुबल यांची पंढरपूर येथे यात्रा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

पंढरपूर येथील जुन्या व नवीन बसस्थानकाकरील नियमित वेळापत्रकाप्रमाणे जाणाऱया बसेसची वाहतूक चंद्रभागा बसस्थानकावरून करण्यात येणार आहे. सातारा विभागाच्या बसेससाठी पार्किंग व्यवस्था चंद्रभागानगर येथे यात्रा बसस्थानकावर करण्यात आलेली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;