जेव्हा लग्नात तुमची ‘एक्स’ समोर येते..; रणबीर-कतरिनाच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

जेव्हा लग्नात तुमची ‘एक्स’ समोर येते..; रणबीर-कतरिनाच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. शाहरुख खान, सलमान खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ.. यांसह इतरही कलाकार अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित  होते. या लग्नाच्या वरातीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या वरातीत सेलिब्रिटी हे सर्वसामान्यांप्रमाणेच धमाल नाचत होते. वरातीच्या एका व्हिडीओ नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये एकीकडे अभिनेता रणबीर कपूर आणि विकी कौशल हे दोघं शाहरुख खानसोबत ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे त्यांना पाहून आलिया भट्ट आणि कतरिना कैफ हे एकमेकींसोबत गॉसिप करताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

रणबीर आणि कतरिना हे एकमेकांना डेट करायचे, ही गोष्ट जगजाहीर होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नंतर रणबीरने आलिया भट्टशी लग्न केलं. तर कतरिनाने विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. आता लग्नात जेव्हा हे दोघं एकमेकांसमोर आले, तेव्हा सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कतरिना आणि आलिया या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे लग्नात या दोघींना एकत्रच पाहिलं गेलं. मात्र रणबीरसुद्धा विकीसोबत थिरकताना दिसल्याने, हे दृश्य पाहणं नेटकऱ्यांसाठी एक वेगळीच पर्वणी होती.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Amit (@tellycreates)

याआधी अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रणबीर आणि कतरिना एकत्र दिसले होते. त्यावेळी रणबीर आलियासोबत आणि कतरिना विकीसोबत तिथे पोहोचली होती. दोघं एकाच विमानात आणि त्यानंतर एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले होते. इतकंच काय तर रणबीरचा सेल्फी घेतानाचा एक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाला होता. कारण त्यावेळी त्याच्या मागेच कतरिना बसली होती.

सोशल मीडियावर आणखी फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोण या दोघी एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. रणबीरने दीपिका पादुकोणलाही डेट केलं होतं. या दोघांचा ब्रेकअप अत्यंत वाईट पद्धतीने झाला होता. त्यामुळे जेव्हा कतरिना आणि दीपिका एकाच फ्रेममध्ये दिसल्या, तेव्हा नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;