विराट कोहली -अनुष्का शर्माचा भक्तीभाव, लंडनमध्ये कीर्तनात दंग, व्हिडिओ व्हायरल, लंडनमधील कीर्तनकार…

विराट कोहली -अनुष्का शर्माचा भक्तीभाव, लंडनमध्ये कीर्तनात दंग, व्हिडिओ व्हायरल, लंडनमधील कीर्तनकार…

Virat and Anushka at the Krishna Das Kirtan in London: टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर विराट कोहली लंडनमध्ये पोहचला. विराट कोहली दुसऱ्यांदा वडील झाल्यानंतर अनुष्का शर्मा दोन्ही मुलांसह लंडनमध्ये आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्का लंडनमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ अन् फोटो व्हायरल होत आहे. आता विराट आणि अनुष्काचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्यात दोन्ही जण भक्तीरसात बुडलेले दिसत आहे. लंडनमध्ये कृष्ण दासच्या कीर्तनात ते सहभागी झाले.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा लंडनमध्ये आपला वेळ घालवत आहे. त्यावेळी ते लंडनमधील कृष्णदास यांच्या कीर्तनात दिसून आले. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत दोन्ही सोबत दिसत आहे. विराट आणि अनुष्का मागील वर्षीदेखील कृष्ण दास यांच्या कीर्तनात आले होते.

अनुष्का शर्माने शेअर केला फोटो

अनुष्का शर्मा हिने आपली इंस्टाग्राम स्टोरीजवर कृष्ण दास यांना टॅग करत कीर्तनचे फोटो शेअर केले आहे. त्यात कृष्ण दास भजन करताना दिसत आहे. कृष्ण दास पारंपरिक भारतीय मंत्रोच्चार आणि संगीतासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी 1960 च्या दशकात आपली आध्यात्मिाक प्रवास सुरु केला. ते नीम करोली यांचे शिष्य आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝐓𝐞𝐞𝐞 ☯ (@virateditz18_)

अनुष्का-विराट नीम करोली यांचे भक्त

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आध्यात्मिक व्यक्तीमत्व आहे. दोन्ही नेहमी धार्मिक स्थळावर पूजा-अर्चना करताना दिसतात. ते ही नीम करोली यांचे भक्त आहे. यामुळे दोन्ही कृष्ण दासच्या कीर्तन भजनात नेहमी दिसतात. विराट आणि अनुष्का लंडनमधील इस्कॉन मंदिरात दिसून आले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर 4 जुलै रोजी भारतीय संघ भारतात दाखल झाला. 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने विजेतेपद मिळवले होते. भारतीय संघाचे देशभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाची भेट घेतली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;