‘धर्मवीर 2’मधील ‘ती’ चूक सुधारणार; कमेंट्सनंतर निर्मात्यांनी केलं स्पष्ट

‘धर्मवीर 2’मधील ‘ती’ चूक सुधारणार; कमेंट्सनंतर निर्मात्यांनी केलं स्पष्ट

काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. मात्र या टीझरमधील एक गोष्ट काहींना खटकली. प्रसाद ओकच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी ही चूक लक्षात आणून दिली. ‘धर्मवीर 2’च्या टीझरमध्ये एक मुस्लिम महिला दिघे साहेबांकडे राखी बांधायला येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात. महिलांना घेऊन जेव्हा आनंद दीघे निघतात, तेव्हा बाजूने लोकल जाताना दाखवली आहे. ही लोकल दिघे साहेबांच्या काळातली नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. त्यावर आता निर्माते मंगेश देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपटात चूक सुधारणार

‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत मंगेश देसाई म्हणाले, “हा चित्रपट अजिबात घाईघाईत शूट केलेला नाही. मला टीझर 7 तारखेलाच प्रदर्शित करायचा होता. त्यामागे काही भावनिक गोष्टी असतात, आपण काही गोष्टी मानतो. मला कोणीतरी सांगितलं की 7 तारीख ‘धर्मवीर 2’च्या टीझरसाठी चांगली आहे. मी आस्तिक आहे आणि हे सगळं मी मानतो. त्यामुळे जेव्हा मी 3 तारखेला टीझर पाहिला, तेव्हा त्यात बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या. मी माझ्या टीमला सूचना दिल्या होत्या की काही झाल्या हा टीझर 7 तारखेलाच प्रदर्शित करायचा आहे. त्यामुळे गडबड झाली. पण यानिमित्ताने मला एक गोष्ट कळली की प्रेक्षक खूप चोख आणि जाणकार आहेत. त्यांचं सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष असतं.”

पहा टीझर-

“ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मी काही नेटकऱ्यांवर नाराज नाही. उलट मी त्यांचे आभार मानतो. तुम्ही दाखवून दिलेली चूक तुम्हाला चित्रपटात सुधारलेली दिसेल. टीझर प्रदर्शित झाल्यावर मी लगेच टीमला सांगितलं. त्यांनीसुद्धा माझी माफी मागितली. पण आता हे चित्रपटात बदललेलं दिसेल. त्या बदलावर काम सुरू आहे. यानिमित्ताने मी नेटकऱ्यांचे मनापासून आभार मानतो”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

काय होते नेटकऱ्यांचे कमेंट्स?

‘दिघे साहेबांच्या काळात ही लोकल ट्रेन नव्हती जी बॅकग्राऊंडमध्ये दाखवली आहे. त्याऐवजी मालगाडी जाताना दाखवली असती तर बरं झालं असतं. ते व्हिएफएक्सने सहज शक्य होतं. कारण आजकाल बाहेरगावी जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या पण नवीन LHB आहेत, जुन्या ICF नाहीत,’ अशी कमेंट एका युजरने केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;