बनावट सिमकार्डचे गुजरात कनेक्शन?

बनावट सिमकार्डचे गुजरात कनेक्शन?

बनावट सिमकार्ड विक्रीसाठी आलेल्या दोघांना क्राइम ब्रँच युनिट 9 ने बेडय़ा ठोकल्या. भावेश गोठी आणि भरत सुथार अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 441 बनावट सिम कार्ड जप्त केली आहेत.

बनावट सिमकार्डचा वापर, देशविघातक कृत्य आणि फसवणुकीसारख्या गुह्यात केला जातो. असे कृत्य करणाऱयावर पोलीस लक्ष ठेवून असतात. वांद्रे परिसरात एक जण बनावट सिमकार्ड विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट-9 ला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन पाटील, दीपक पवार, सहायक निरीक्षक महेंद्र पाटील, उत्कर्ष वझे, उप निरीक्षक सुजित झने, नरेंद्र पालकर आदीच्या पथकाने तपास सुरू केला.  शनिवारी सायंकाळी पोलिसांनी वांद्रेच्या लाल मिट्टी परिसरात फिल्डिंग लावली. त्यानंतर पोलिसांनी भावेश आणि भरतला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने ती सिमकार्ड विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी भावेशकडून 331 तर भरतकडून 131 सिमकार्ड जप्त केली. त्या दोघांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याचा तपास युनिट-9 कडे सोपवण्यात आला. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या दोघांनी ती सिमकार्ड कोणाकडून आणि कशा प्रकारे मिळवली होती. ती सिमकार्ड ते नेमके कोणाला देणार होते का, त्या दोघांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार टोळीशी संबंध आहे का, त्याने यापूर्वी बनावट सिमकार्डची विक्री केली होती का, त्यांना बनावट सिमकार्ड मिळवून देण्यात कोणी मदत केली होती का, त्याने बनावट सिमकार्डचा वापर करून कोणता गुन्हा केला आहे का याचा तपास युनिट-9 करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;