Nagar News : जिल्हा मागणीसाठी ‘श्रीरामपूर’मध्ये कडकडीत बंद, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Nagar News : जिल्हा मागणीसाठी ‘श्रीरामपूर’मध्ये कडकडीत बंद, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या मागणीसाठी आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. श्रीरामपूरमधील व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असून त्याचं क्षेत्रफळ 17412 चौ. किमी आहे. हा जिल्हा तसा दोन भागांत विभागला आहे, उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा. गोवा राज्यापेक्षा पाचपट क्षेत्रफळ नगर जिल्ह्याचे आहे. त्याच्या विभाजनाची मागणी गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे. यासाठी अनेक आंदोलने, निवेदने आणि सह्यांची मोहीम घेऊन आंदोलने प्रभावीपणे राबविण्यात आली. परंतु शासनाने या मागणीकडे वारंवार कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. त्यास श्रीरामपूर येथील नागरिकांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. तसेच श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनता सहभाग नोंदवत बंद यशस्वी केला. उत्तर नगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे हे तालुके येतात. या सर्व तालुक्यांमध्ये प्रामुख्याने भौगोलिकदृष्ट्या श्रीरामपूर तालुका मधोमध येतो. त्यामुळे राज्य सरकार या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;