वैजापूर तालुक्यात 40 वर्षांच्या महिलेचा कुपोषणाने मृत्यू; पंतप्रधान महाराष्ट्रात लक्ष देणार का?

वैजापूर तालुक्यात 40 वर्षांच्या महिलेचा कुपोषणाने मृत्यू; पंतप्रधान महाराष्ट्रात लक्ष देणार का?

मोठ्या थाटामाटात तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे पंतप्रधान मोदी यांनी कधीकाळी कुपोषण हा राष्ट्रीय कलंक असल्याचे म्हटले होते. मात्र, आता केवळ गरिबांना मोफत अन्नधान्य देत पोट भरत नसल्याचे सिद्ध झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पारळा गावात 40 वर्षांच्या आदिवासी महिलेचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. ललीता सोमनाथ मोरे (40) या महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शासन आपल्या दारी म्हणणारे मिंधे गटाचे रमेश बोरनारे या वैजापूर तालुक्यात आमदार असताना पारळा, भादली, वडजी आणि तलवाडा भागात अनेक भागात कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाचे वाभाडे निघाल्यानंतर प्रशासनाने आता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्याची मागणी माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) उपजिल्हाध्यक्ष विशाल शेळके यांनी केली.

केंद्र आणि राज्याच्या डझनभर योजना फक्त फोटोसेशन आणि जाहिरातीसाठी का?
हिंदुस्थानात महिला आणि बालकांचे कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक असून, जागतिक सरासरीवर 16 व्या स्थानांवर आहे. देशात आणि राज्यात महिला आणि बालकांसाठी डझनभर योजना काढल्या आहेत. या योजना केवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याच्या फोटोसेशन आणि जाहिरातीसाठी आहे का? असा सवाल करण्यात येत आहे. यामध्ये एकात्मिक बालसंगोपन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, मध्यान्ह भोजन, राजीव गांधी कन्या सक्षमीकरण योजना-सबला, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना यांसारख्या आरोग्याशी संबंधित योजनांसह मनरेगा व टीपीडीएस यांसारख्या डझनभर योजनांचा सरकार संसद आणि विधीमंडळात हवाला देते. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मग कुठे काम करतात, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;