सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे रोमांटिक फोटो व्हायरल, भांगात सिंदूर आणि…

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे रोमांटिक फोटो व्हायरल, भांगात सिंदूर आणि…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून 2024 रोजी लग्न केले. या लग्नाच अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. सोनाक्षी सिन्हा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष डेट केल्यानंतर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला तिच्या घरच्यांकडून विरोध असल्याचेही सांगितले जात होते.

दुसरीकडे लग्नात वडिलांचा हात धरूनच सही करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली. सोनाक्षी सिन्हा हिने वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांना त्यांच्या 44 व्या लग्नाच्या वाढदिवसाला खास गिफ्ट दिले. खास पार्टी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आली होती. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ या पार्टीला पोहोचले नाहीत. लव आणि कुश सोनाक्षी सिन्हावर लग्नानंतर नाराज आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच इंस्टाग्राम स्टोरीवर अत्यंत खास असे फोटो शेअर केले आहेत. पती झहीर इक्बाल याच्यासोबत रोमांटिक फोटो सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे अत्यंत जबरदस्त अशा लूकमध्येही सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे. चाहत्यांना सोनाक्षी सिन्हा हिचा हा लूक आवडलाय.

सोनाक्षी सिन्हा हिने भांगामध्ये सिंदूर, लाल टिकली, गोल्डन रंगाचा मोठे कानातले आणि लाल रंगाचा सुंदर असा ड्रेस घातलाय. दुसरीकडे झहीर इक्बाल याने काळ्या रंगाची शेरवानी घातल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे फोटोसाठी जबरदस्त अशा पोझ देताना दिसत आहेत. हे फोटो चाहत्यांना आवडताना देखील दिसत आहेत.

झहीर इक्बाल यानेही सोशल मीडियावर खास फोटो शेअर केलाय. हा फोटो अंबानींच्या पार्टीतील आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, सलमान खान आणि संजय दत्त हे दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे नुकताच अनंत अंबानी याच्या शुभ आशिर्वाद सेरेमनीमध्ये पोहोचले होते. आता सोनाक्षी सिन्हा हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;