मलायाकाला पश्चाताप होत असेल…, दुसऱ्या पत्नीसोबत रोमँटिक फोटो, अरबाज खान असं काय म्हणाला?

मलायाकाला पश्चाताप होत असेल…, दुसऱ्या पत्नीसोबत रोमँटिक फोटो, अरबाज खान असं काय म्हणाला?

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. पण काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायका यांचं देखील नातं तुटल्याची माहिती समोर आली. तर अरबाज खान याने घटस्फोटाच्या 6 वर्षांनंतर मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर देखील अरबाज – शूरा यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं.

सोशल मीडियावर अरबाज – शूरा यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात, पण आता खुद्द अरबाज याने दुसऱ्या पत्नीसोबत काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अरबाज – शूरा यांनी काळ्या रंगाचे कपडे घतले आहेत. फोटो पोस्ट करत अरबाज याने कॅप्शनमध्ये, ‘मार्ग हाच आहे…’ असं लिहिलं आहे.

अरबाज कायम शूरा हिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत पत्नीवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतो. चाहते देखील दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मलायकाला आता पश्चाताप होत असेल. तरुण मुलासाठी अरबाजला सोडलं… ‘

दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘खूप चांगलं कपल आहे… कायम एकत्र राहा…’, तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘भाऊ आणि वहिनी…’ सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अरबाज – शूरा यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील दोघांची जोडी आवडते.

अरबाज – शूरा यांचं नातं

अरबाज याने शूरा हिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना देखील धक्का बसला. कारण अरबाज – शूरा यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणाला माहिती नव्हतं. जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अरबाज – शूरा यांनी लग्न केलं. दोघांनी लग्न केल्यानंतर अरबाज – शूरा यांच्या वयाबाबत अनेक चर्चा रंगल्या.

अरबाज खान आणि मलायका अरोरा

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज – मलायका यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला. दोघांना एक 21 वर्षांचा मुलगा देखील आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;