अनंत-राधिकाच्या लग्नाला का गेली नाही करीना कपूर? आता लिहिली पोस्ट

अनंत-राधिकाच्या लग्नाला का गेली नाही करीना कपूर? आता लिहिली पोस्ट

देशातील सर्वांत मोठे व्यावसायिक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने शुक्रवारी रात्री राधिका मर्चंटशी धूमधडाक्यात लग्न केलं. या लग्नाला देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते. राजकीय, क्रीडा, चित्रपट आणि इतर अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला पोहोचले होते. अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पहायला मिळते. लग्नातही अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र या सर्वांत अभिनेत्री करीना कपूर कुठेच दिसली नाही. करीना आणि तिचा पती सैफ अली खान हे दोघं अंबानींच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. आता करीनाने सोशल मीडियावर याविषयी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने अनंत आणि राधिकाला शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.

करीना कपूरची पोस्ट-

अनंत आणि राधिका.. तुम्हा दोघांनाही आयुष्यभर आनंदाच्या शुभेच्छा. आम्ही सेलिब्रेशन मिस केलं. आमच्याकडून खूप प्रेम. सैफ आणि करीना’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. करीना जरी या लग्नाला उपस्थित नसली तर तिची सावत्रं मुलं म्हणजेच अभिनेत्री सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम खान या लग्नाला आणि त्यापूर्वीच्या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित होते.

अनंत आणि राधिकाच्या लग्नाला करीना का उपस्थित नव्हती, याचं कारण मात्र तिने सांगितलेलं नाही. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा जामनगरमध्ये भव्य प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता, तेव्हा मात्र करीना आणि सैफ तिथे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजित दोसांझने करीना आणि सैफला स्टेजवर बोलावून आपल्या गाण्यावर थिरकण्यास सांगितलं होतं. करीनाच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

अंबानींच्या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अमिताभ आणि जया बच्चन, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, शाहरुख आणि गौरी खान, तमिळ सुपरस्टार रजनीकांत, हॉलिवूड अभिनेता आणि डब्ल्युडब्ल्युई फेम जॉन सीना, सलमान खान, संजय दत्त, अर्जुन कपूर, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर-आलिया भट्ट, विकी कौशल-कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा-निक जोनास, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, बाबा रामदेव, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी यांसह इतर अनेक मान्यवर या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;