संस्कृती यांनीच जपली..; अंबानींच्या लग्नात दाक्षिणात्य कलाकारांनी जिंकली मनं
'वेडिंग ऑफ द इयर' म्हणून संबोधल्या गेलेल्या अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला देश विदेशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
अमिताभ आणि जया बच्चन यांचे आशीर्वाद घेणारा शाहरुख खान, रजनीकांत, अनील कपूर आणि रणवीर सिंहचा भन्नाट डान्स, अशी अनेक दृश्ये या सोहळ्यात पहायला मिळाली.
भव्य प्री-वेडिंगच्या जल्लोषानंतर मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत आणि मोठे व्यावसायिक वीरेन आणि शैला मर्चंट यांची कन्या राधिका यांनी शुक्रवारी मुंबईत लग्नगाठ बांधली.
वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जिओ वर्ल्ड ड्राइव्ह इथं पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपट, राजकीय, क्रीडा तसंच इतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पहायला मिळाली. सोशल मीडियावरही या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले.
एकीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात या लग्नसोहळ्यात झळकले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य कलाकारांनी आपली परंपरा जपत नेटकऱ्यांची मनं जिंकली.
रजनीकांत, रामचरण, राणा डग्गुबती, व्यंकटेश, महेश बाबू, सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका अशा विविध साऊथ सुपरस्टार्सनी अंबानींच्या कार्यक्रमाला लक्षवेधी पोशाखात हजेरी लावली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याचा उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या.
संस्कृती यांनीच जपली.. असं म्हणत नेटकऱ्यांनी दाक्षिणात्य कलाकारांचं कौतुक केलं. रजनीकांत, सूर्या यांसारख्या कलाकारांनी दाक्षिणात्य संस्कृतीचं प्रतीक असलेला मुंडू परिधान केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.










Comment List