वेटिंग लिस्ट प्रवाशांनो, लक्ष द्या…तिकीट कन्फर्म असेल तरच सुखाचा प्रवास करा!

वेटिंग लिस्ट प्रवाशांनो, लक्ष द्या…तिकीट कन्फर्म असेल तरच सुखाचा प्रवास करा!

रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट कन्फर्म असणे गरजेचे आहे. वेटिंग लिस्ट तिकीट असल्यास रेल्वेने प्रवास करता येत नाही, असा रेल्वेचा नियम आहे. परंतु रेल्वेने आता या नियमांसंबंधी कठोर अंमलबजावणी करायला सुरुवात केली असून वेटिंग लिस्टमधील प्रवाशी जर आरक्षित डब्यातून प्रवास करत असतील तर अशा प्रवाशांविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास आता कन्फर्म तिकिटाशिवाय करू नये, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यातi आले आहे. कोणीही हा नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चालू प्रवासामध्येच बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. टिकीट चेकिंग करणाऱया टीसींनासुद्धा तसे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.  वेटिंग तिकीटवर रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करण्यास रोख लावला जाणार आहे.  तिकीट ऑफलाईन पद्धतीने जरी काढले असेल तरी आरक्षित डब्यात प्रवास करता येणार नाही. कन्फर्म तिकीटने प्रवास करणाऱयांच्या सोयीसाठी हा निर्णय लागू केला.

440 रुपयांचा दंड

रेल्वेचा स्पष्ट नियम आहे की, जर तुम्ही तिकीट खिडकीतून तिकीट घेतले असेल आणि ते वेटिंगवर असेल तर तुम्ही ते रद्द करून पैसे परत मिळवू शकता, मात्र असे करण्याऐवजी प्रवासी डब्यात चढून सर्रास प्रवास करतात. वेटिंग तिकीट असलेला प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करताना आढळल्यास त्याला 440 रुपयांचा दंड आकारला जात आहे. तसेच या प्रवाशाला चालू प्रवासातच बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो किंवा सामान्य डब्यात जाण्यास सांगितले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;