फक्त वॉशरुमसाठी 200 रुपये..; भूस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली ‘चंद्रमुखी चौटाला’

फक्त वॉशरुमसाठी 200 रुपये..; भूस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली ‘चंद्रमुखी चौटाला’

जोशीमठच्या डोंगरावरून भूस्खलन झाल्याने उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. महामार्गावर मोठमोठे दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक पर्यटक त्याठिकाणी अडकले आहेत. ‘एफआयआर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कविता कौशिकसुद्धा तिचा पती रोनित आणि पाळीव श्वानासोबत बद्रिनाथमध्ये अडकली आहे. गेल्या चार दिवसांपासून ती जोशीमठ इथल्या आर्मी कॅम्पमध्ये राहतेय. “महामार्गावर हजारांपेक्षा जास्त गाड्या अडकल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी किती लोकं अडकली आहेत, याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. पोलीस, सैन्यदल आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हे सातत्याने रस्ता मोकळा करण्यासाठी काम करत आहेत. पण रस्त्याचा एक भाग मोकळा केला की दुसऱ्या भागावर दरड कोसळतेय. त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत भयंकर आहे”, अशी माहिती कविताने ‘ई टाइम्स’शी बोलताना दिली.

कविता कौशिक तिच्या वाढदिवसानिमित्त पती रोनित बिस्वास, पाळीव श्वान आणि चुलत भावासोबत बद्रीनाथला देवदर्शनासाठी गेली होती. देहरादूनपासून बद्रीनाथपर्यंत त्यांनी सुरळीत प्रवास केला आणि देवदर्शनही केलं. मात्र तिथून परतताना बद्रीनाश महामार्गावर भूस्खलन झाल्यामुळे चार दिवसांपासून ते तिथेच अडकले आहेत. बद्रीनाथजवळच असलेल्या माना गावात कविता कौशिक तीन दिवस अडकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kavita Kaushik (@ikavitakaushik)

याविषयी ती म्हणाली, “8 जुलै रोजी रस्ता साफ झाल्यानंतर आम्ही जोशीमठला पोहोचलो. पण जोशीमठला पोहोचताच आम्हाला समजलं की दोन मोठे दरड महामार्गावर कोसळले आहेत. त्यामुळे संपूर्ण महामार्ग ब्लॉक झाला होता. आता आम्ही जोशीमठ याठिकाणी आर्मी कॅम्पमध्ये राहतोय. माझ्या पतीचे मित्र आर्मी ऑफिसर आहेत. ते आमची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. मात्र आमच्यासारखेच इतरही बरेच जण इथे अडकले आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kavita Kaushik (@ikavitakaushik)

एकीकडे भूस्खलनामुळे अनेक पर्यटक याठिकाणी अडकले असताना हॉटेलवाले त्यांच्याकडून पैसे लुटत असल्याचा अनुभवही कविताने सांगितला. “इथे रेस्टॉरंट आणि हॉटेलवाले फक्त वॉशरुम वापरण्यासाठी 200 रुपये घेत आहेत. सैन्यातील लोकांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी तिथे जाऊन हॉटेलवाल्यांना पर्यटकांची मदत करण्यास सांगितलं. गेल्या चार दिवसांपासून आम्ही इथे अडकलोय आणि आता मी खरंच वैतागली आहे”, असं ती पुढे म्हणाली.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, चमोली याठिकाणी मोठमोठे दरड कोसळल्याने बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे अनेक प्रवासी अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे चंपावत आणि उधमसिंग नगर जिल्ह्यातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;