मोत्यांचे हार, सोन्याचे लॉकेट्स, अंगठ्या अन्… केरळमध्ये महिला मजुरांना सापडला डोळे दिपवणारा खजिना

मोत्यांचे हार, सोन्याचे लॉकेट्स, अंगठ्या अन्… केरळमध्ये महिला मजुरांना सापडला डोळे दिपवणारा खजिना

केरळमधील कन्नर जिल्ह्यातील चेंगलयी येथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी (रेन वॉटर हार्वेस्टींग) खड्डा खोदत असताना महिला मजुरांना डोळे दिपवणारा खजिना सापडला आहे. खड्डा खोदत असताना महिलांना एक लोखंडी डब्बा सापडला. यात बॉम्ब असू शकतो अशी शंका आल्याने महिलांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत डब्बा ताब्यात घेतला. यानंतर तो फोडून बघितला असता त्यात पुरातन खजिन असल्याचे समोर आले.

कन्नूरमधील एका सरकारी शाळेजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी खड्डा खोदण्याचे काम महिला मजुर करत होत्या. याचवेळी त्यांना मौल्यवान वस्तुंनी भरलेला डब्बा सापडला. यात मोत्यांचे 17 हार, सोन्याचे 13 लॉकेट्स, चार पदकं, पाच पुरातन अंगठ्या, कानातले आणि अनेक चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाचे पाणी साठवण्यासाठी खड्डा खोदत असताना ही घटना घडली. टाइम्स ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.

डब्बा सापडल्यानंतर सुरुवातीला त्यात बॉम्ब असावा अशी शंका महिला मजुरांना आली. त्यामुळे महिलांनी तात्काळ याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एम.व्ही. शिजू यांच्या पथकाने घटनास्थळ गाठत सदर डब्बा आपल्या ताब्यात घेतला. डब्बा फोडून पाहिला असता त्यात पुरातन खजिना असल्याचे उघड झाले.

शुक्रवारी पोलिसांनी सदर खजिना न्यायालयापुढे सादर केला. आता पुरातत्व विभागा खोदकामादरम्यान सापडलेल्या वस्तुंची तपासणी करणार आहे. त्यानंतर हा डब्बा नेमका कधीचा आहे आणि तो कुठून आला याचा शोध लागेल. मात्र प्राथमिक मुल्यांकनानुसार डब्बा आणि त्यातील वस्तू खूप जुन्या असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील गावकऱ्यांना खोदकाम करताना हडप्पा काळातील प्राचीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या होत्या. हडप्पा कालखंडाची आठवण करून देणारा हा शोध पुरातत्व विभाग आणि गावकऱ्यांमध्ये आश्चर्याचा विषय झाला होता. गावकऱ्यांनी धोलाविरा येथे हडप्पा संस्कृतीशी सांधर्म्य असलेल्या तंटबंदीचे अवशेष शोधले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;