लग्नाच्या मेन्यूत नॉनव्हेज ठेवले नाही, भर मांडवात वरपक्षाकडून वधूपक्षाला मारहाण

लग्नाच्या मेन्यूत नॉनव्हेज ठेवले नाही, भर मांडवात वरपक्षाकडून वधूपक्षाला मारहाण

लग्नाच्या मेन्यूमध्ये नॉनव्हेज ठेवले नाही म्हणून नवरदेवाच्या नातेवाईकांनी नवरीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांना मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया परिसरात ही घटना घडली. या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत.

अभिषेक शर्मा या तरुणाचा देवरियातील आनंद नगर गावातील सुषमा नामक तरुणीशी विवाह ठरला होता. त्याप्रमाणे 11 जुलै रोजी अभिषेक वरात घेऊन सुषमाच्या घरी आला. लग्न पार पडल्यानंतर सर्व वऱ्हाडी मंडळी जेवायला गेली.

जेवणाच्या मेन्यूमध्ये पनीर, पुलाव, विविध प्रकारच्या कढी असे शाकाहारी पदार्थ होते. शाकाहारी पदार्थ पाहताच नवऱ्याकडील लोक चिडले. मांसाहारी जेवण ठेवले नाही म्हणून वरपक्षाकडील लोकांनी वाद घातला.

नवरदेवाने नवरीला जेवण लग्नात काय ठेवले असे विचारले. नवरीने शाकाहारी जेवण असल्याचे सांगताच नवरदेवाने नवरीला कानशिलात लगावली. यानंतर नवऱ्याकडील लोकांनी वधूच्या आई-वडिलांना मारहाण केली.

यानंतर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. दोन्ही पक्षांनी लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. यात वधू पक्षातील सहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी नवरदेवासह काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;