राज्यावर आठ लाख कोटींचा कर्जाचा बोजा; कॅग अहवालावरून महायुतीवर विरोधकांचा निशाणा

राज्यावर आठ लाख कोटींचा कर्जाचा बोजा; कॅग अहवालावरून महायुतीवर विरोधकांचा निशाणा

मागील दोन वर्षांत या सरकारने तब्बल अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज काढल्याने राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. ऋण काढून सण करण्याच्या महायुती सरकारच्या प्रवृत्तीमुळे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे. राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करीत असल्याची घणाघाती टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती सरकारवर केली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘पॅग’च्या अहवालात महायुती सरकारच्या खर्चात ताळमेळ नसल्याचा ठपका ठेवला आहे. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘पॅग’च्या अहवालात राजाच्या आर्थिक बेशिस्तीवरच बोट ठेवले आहे. महायुती सरकारने राज्याला दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर पोहचले आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

सरकारचा मौजमजेचा दृष्टिकोन

पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल, पण वाडवडिलांनी कष्टाने कमावलेले सर्व फुंकून टाकून फक्त आजच्या दिवशी कशी मौजमजा करता येईल, असाच सध्याच्या राज्यकर्त्यांचा राज्य चालवतानाचा दृष्टिकोन असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

 कोटय़वधींच्या पुरवणी मागण्या

अर्थसंकल्पातील तरतुदी आणि पुरवणी मागण्यांवर बोलताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च होत नसतानाही कोटय़वधी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर झाल्या. अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेच 94 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या. पुरवणी मागण्यांवर चर्चेविना बहुमताच्या जोरावर या मागण्या मंजूर करून घेतल्या.

 राज्य सरकारच्या 41 सार्वजनिक पंपन्यांचा संचित तोटा 51 हजार कोटी रुपयांवर गेल्याचा ठपकाही ‘पॅग’च्या अहवालात ठेवला आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले की, निष्क्रिय सार्वजनिक उपक्रमांमधील गुंतवणूक व महामंडळे पांढरा हत्ती ठरत आहेत. या महामंडळांचा संचित तोटा 50 हजार कोटींवर गेला आहे हे चिंताजनक आहे. कोटय़वधी रुपयांच्या प्रकल्पासाठी कर्ज काढायचे व त्यातून कमिशनखोरी होते. या आर्थिक अनागोंदीचा प्रतिकूल परिणाम राज्याच्या आर्थिक प्रगतीवर होईल अशी भीती नाना पटोले यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;