चंद्रपुरात शालेय शिक्षणाचे तीनतेरा; शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अपुरे शिक्षक…जीर्ण इमारत…

चंद्रपुरात शालेय शिक्षणाचे तीनतेरा; शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, अपुरे शिक्षक…जीर्ण इमारत…

शाळा-महाविद्यालयात दिसण्याऐवजी   चंद्रपूर जिह्यातील विविध शाळांतील विद्यार्थी आता आंदोलने करताना दिसतायत. याला कारणही तसेच आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाला वेळ नाही. शाळांच्या इमारती जीर्ण होत चालल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, सरपटणाऱया प्राण्यांचा वावर असतो अशा समस्या विद्यार्थ्यांसमोर उभ्या आहेत. यामुळे जिह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. शाळांची दुरवस्था आणि आपल्या पाल्यांची होत असलेली फरफट पाहता पालक चिंताग्रस्त झाले आहेत.

    जिह्यातील शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यास कुणालाच स्वारस्य नाही. शाळेपर्यंत पोहचायचे कसे हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. एसटी बसमध्ये अनेकदा गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवले जाते. विद्यार्थी शाळेत पोहोचू शकत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होत आहे. अनेक शाळेत शिक्षक नाहीत. जेथे शिक्षक आहेत ते वेळेवर येत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक वर्गात आले तरी मोबाईलमध्ये गुंतून असतात. शिक्षकांवर कुणाचाही वचक नाही. जिह्यात अनेक शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहे. विद्यार्थांना एका खोलीत, सभागृहात एकत्र बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक शाळा घाणीने आणि शाळांचे रस्ते चिखलाने माखले आहेत. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही. वारंवार सूचना करूनही यात सुधारणा झालेली नाही.

मुलींची शाळा बनली दारुडय़ांचा अड्डा   

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात  जिल्हा परिषदेची पहिली मुलींची शाळा आहे. ही शाळा आता दारुडय़ांचा अड्डा बनली आहे. शाळेच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आणि खर्रा खाऊन पिचकाऱया मारलेल्या दिसत आहेत. शाळा भरायच्या आधी आणि सुटल्यानंतर येथे दारुडय़ांचा वावर असतो. शाळेच्या परिसरातील हे चित्र पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;