अनंत-राधिकाच्या लग्नात असं काय दिसलं की, लोकं म्हणाले ऐश्वर्या अभिषेकचा घटस्फोट कन्फर्म

अनंत-राधिकाच्या लग्नात असं काय दिसलं की, लोकं म्हणाले ऐश्वर्या अभिषेकचा घटस्फोट कन्फर्म

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर 13 जुलै रोजी आशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आलाय. ज्यामध्ये बॉलिवूडच्या स्टार्सनी हजेरी लावली. उद्योगपती, खेळाडू आणि राजकारण्यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, रजनीकांत देखील या सोहळ्याला पोहोचले होते. महत्त्वाचे म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन त्यांचा जावई निखिल नंदा आणि नात नव्या नवेली नंदासोबत पोहोचले होते. तर ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्यासोबत दिसली. पण लोकांना या लग्नाच्या असं काय दिसलं की, लोकं ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट झाल्याचं बोलू लागले आहेत.

लग्नाच्या दिवशीही ऐश्वर्या सासर आणि पतीपासून वेगळी आली होती. आणि आजही ते वेगवेगळे स्पॉट झाले. ती गुजराती प्रिंट फ्रॉकसूटमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. तर तिची मुलगी आराध्या हिने गुलाबी रंगाचा फ्रॉक सूट घातला होता. आता त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते दोघे पापाराझींसाठी पोज देत आहेत.

आराध्या आणि ऐश्वर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांना असे पाहून चाहते वेडे झाले आहेत. एकाने लिहिले की, ‘ऐश्वर्या राय सार्वजनिक ठिकाणीही तिच्या मुलीची खूप काळजी घेते.’ एकजण म्हणाला, ‘सून आणि नात वेगवेगळ्या झोनमध्ये का आहेत?’ हे दोघे बच्चन कुटुंबासोबत का नाहीत. एकजण म्हणाला, ‘घटस्फोट झालाय असं दिसतंय.’ एकाने लिहिले, ‘ती नंदिनी वाइब्स देत आहे.’ एकाने सांगितले की, ‘सलमानला काळा रंग खूप आवडतो, म्हणूनच ऐश्वर्याने काळा रंग घातला आहे.’ एकजण म्हणाला, ‘बाकी बच्चन कुटुंबापासून वेगळे का फिरतात?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

लग्नाच्या दिवशीही अमिताभ आणि जया बच्चन त्यांची मुलगी श्वेता हिचे कुटुंब आणि मुलगा अभिषेकसोबत दिसले होते. मात्र यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या तिथे नव्हत्या. दोघेही बऱ्याच दिवसांनी लग्नात दिसले. आणि याआधीही ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याबद्दल बरेच काही बोलले जात आहे. घटस्फोटाचे दावे केले जात आहेत. मात्र खरे प्रकरण काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;