पुण्यातील तरुण अमेरिकेत बेपत्ता, पालकांचा मदतीसाठी टाहो!

पुण्यातील तरुण अमेरिकेत बेपत्ता, पालकांचा मदतीसाठी टाहो!

अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेला पुण्याचा तरुण तेथील खाडीत बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धांत विठ्ठल पाटील असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. सिद्धांत सात मित्रांसोबत अमेरिकेतील मोंटाना राज्यातील ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये पिकनिकला गेला होता. 6 जुलै रोजी मित्रांसोबत हायकिंग गेलेला सिद्धांत खाडीत तोल जाऊन पडला आणि बुडाला. बेपत्ता सिद्धांतला शोधण्यासाठी मोहीम सुरू असल्याची माहिती ग्लेशियर नॅशनल पार्कच्या प्रवक्त्यांनी दिली.

हायकिंगला जाण्याआधी शनिवारी सकाळी सिद्धांतने आईला मॅसेज करून आपण मित्रांसोबत पिकनिक जाणार असल्याचे सांगितले. आईला मॅसेज केल्यानंतर मोबाईल रुममध्ये ठेवून सिद्धांत मित्रांसोबत खाडीत हायकिंग करायला गेला. यावेळी खडकावर उभा असताना तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्यानंतर एकदा त्याचे डोकेवर दिसले आणि मग तो दिसेनासा झाला. त्याचा तोल गेला की आणखी काही घडले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खाडी आणि आजूबाजूच्या परिसरात हेलिकॉप्टरद्वारे सिद्धांतचा शोध घेण्यात आला. तसेच 10 हून अधिक रेंजर्सनेही खाडीच्या बाजूने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सिद्धांत हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. मुलगा बेपत्ता झाल्याने आई-वडील चिंतेत आहेत. तर अधिकाऱ्यांकडून पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत, असा आरोप सिद्धांतचे मामा प्रितेश चौधरी यांनी केला आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री ए. जयशंकर यांना पत्र लिहून याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;