उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकरांचे केले अभिनंदन
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले. त्यांना निवडणुकीत 24 मतं मिळाली. या विजयानंतर मिलिंद नार्वेकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झालं आणि त्यानंतर लगेच मतमोजणी सुरू झाली आणि काही वेळातच निकाल जाहीर करण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर ह्यांचे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी सौ. रश्मीवहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते… pic.twitter.com/ta8nGPjYAE
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 13, 2024
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. रश्मीवहिनी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List