Mumbai Rain : पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम, तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक 20 मिनिटं उशिराने

Mumbai Rain : पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम, तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक 20 मिनिटं उशिराने

मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. या पावसाचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक जवळपास 20 मिनिटं उशिराने सुरू आहे.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट आहे. तर अमरावती वर्धा, नागपूर गोंदियाला यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय पुढचे दोन दिवस कोकणाला मुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये आणि पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईच्या रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. तर मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनची वाहतूकही 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. तसेच हार्बर मार्गावरील वाहतूक 15-20 मिनिटं उशिराने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पाणी तुंबल्यामुळे अंधेरी सबवे येथील वाहूतक बंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;