Madhuri Dixit: जेव्हा 18 वर्ष मोठ्या क्रिकेटरच्या प्रेमात माधुरीने उचललं होतं असं पाऊल, जाणून व्हाल हैराण

Madhuri Dixit:  जेव्हा 18 वर्ष मोठ्या क्रिकेटरच्या प्रेमात माधुरीने उचललं होतं असं पाऊल, जाणून व्हाल हैराण

क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडचं फार जवळचं नातं आहे. काही क्रिकेटर आणि सेलिब्रिटींमध्ये चांगली मैत्री आहे, तर काही क्रिकेटपटूंचं नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आलं आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यापासून अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यापर्यंत अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंसोबत लग्न केलं. तर काही अभिनेत्रींचं क्रिकेटपटूंवर असलेलं प्रेम अर्ध राहिलं. असंच काही झालं आहे, अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत. एक काळ असा होता जेव्हा माधुरी आणि माजी क्रिकेटर अजय जडेजा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. फक्त झगमगत्या विश्वातच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.

अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रेमाबद्दल प्रत्येकाला माहिती होतं. पण माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्यावर अभिनेत्रीचं क्रश होतं. सुनील गावस्कर असे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी टीम इंडियाचे नेतृत्वही केलं आहे. सुनील गावस्कर हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक ठरले. तेव्हा तरुणींमध्ये सुनील गावस्कर यांची चर्चा सर्वत्र रंगलेली असायची.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Shriram Nene (@drneneofficial)

 

सुनील गावस्कर हे माधुरी हिच्यापेक्षा 18 वर्ष मोठे आहेत. पण असं असताना देखील सुनील गावस्कर, माधुरीचे क्रश होते. एका मुलाखतीत माधुरी हिने मनातील भावना देखील बोलून दाखवल्या होत्या. ‘मी सुनील गावस्कर यांची फार मोठी चाहती आहे. मला त्यांच्या मागे धावायचं आहे…’ तेव्हा माधुरी फक्त 25 वर्षांची होती आणि सुनील गावस्कर हे 43 वर्षांचे होते.

माधुरी दीक्षित – अजय जडेजा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय जडेजा राजघराण्यातील होते. तर माधुरी ब्राह्मण मध्यमवर्गीय कुटुंबातली. म्हणून अजयच्या कुटुंबीयांना दोघांचं नातं मान्य नव्हतं. अशा परिस्थितीत माधुरी दीक्षितच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्या नात्याला विरोध केला. शिवाय, अजय यांचं नाव मॅच फिक्सिंगमध्ये आल्यानंतर माधुरी यांच्या कुटुंबियांनी अजय जडेजा यांच्यासोबत असलेल्या नात्याला विरोध केला.

सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटींसोबत माधुरी हिच्या नावाची चर्चा झाली. पण झगमगत्या विश्वातील कोणत्यात सेलिब्रिटीसोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर माधुरीने डॉ.श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले आणि अमेरिकेत गेली. अनेक वर्षांनंतर माधुरी पुन्हा मुंबईमध्ये आली. आता अभिनेत्री  कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;