ऐश्वर्या कुटुंबाचा भाग नाहीच…, अंबानींच्या लग्नात दिसून आलं बच्चन कुटुंबातील सत्य, पाहा व्हिडीओ

ऐश्वर्या कुटुंबाचा भाग नाहीच…, अंबानींच्या लग्नात दिसून आलं बच्चन कुटुंबातील सत्य, पाहा व्हिडीओ

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न राधिका मर्चंट यांच्यासोबत मोठ्या थाटात पार पडल. दोघांच्या लग्नात देश – विदेशातील दिग्गज व्यक्ती सामिल झाले होते. बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील मोठ्या संख्यने हजेरी लावली होती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंबिय देखील अंबानींच्या शाही लग्नात सामिल झाले होते. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अंबानी यांच्या लग्नात सामिल झालेल्या बच्चन कुटुंबाचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन नंदा, निखील नंदा, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा दिसत आहेत. व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नातं आराध्या बच्चन दिसत नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

कुटुंबाचा भाग नाहीच…’, ‘ऐश्वर्या हिच्या शिवाय बच्चन कुटुंब कधीच पूर्ण होणार नाही…’असं देखील नेटकरी कमेंट करत म्हणत आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय चाहते देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

ऐश्वर्या देखील अंबानी यांच्या लग्नात पोहोचली होती, पण ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र पोहोचले होते. सोशल मीडियावर दोघींचा व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघींसोबत बच्चन कुटुंबिय नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त राहात असल्याची चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगत आहे. पण यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर येत नाही. पण समोर येत असलेल्या व्हिडीओमुळे बच्चन कुटुंबात वाद असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांचं लग्न

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या हिच्यासोबत ऐश्वर्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. अनेक ठिकाणी दोघींनी एकत्र स्पॉट देखील केलं जातं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;