लाईव्ह कार्यक्रमात डान्सरचे भयंकर कृत्य, कोंबडीसोबत केले असे काही
आंध्र प्रदेशमधील अनाकापल्ली जिल्ह्यात एका कार्यक्रमात डान्सरने चक्क डान्स करताना कोंबडीच्या मानेचाच लचका तोडल्याचे समोर आले आहे. डान्सरने केलेला हा भयंकर प्रकार पाहून उपस्थित प्रेक्षक देखील हादरले. या प्रकरणी डान्सरविरोधात पेटाने गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात डान्सर नाचता नाचता अचानक एक कोंबडी हातात घेतो व दातांनी तिचे मुंडके धडावेगळे करत असल्याचे त्यात दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पेटाच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून त्या डान्सर विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी वर भारतीय कायद्यान्वये जनांवरांप्रती अमानुष कृत्य करणे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जे प्राण्यांना त्रास देतात त्यांना मानवी जिवाची देखील पर्वा नसते असे दिसून आले आहे. त्यामुळे सर्वांच्याच सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या घटनांविरोधात तक्रार दाखल होणं गरजेचं आहे, असे पेटा इंडियाचे अधिकारी सिनचाना सुब्रमण्यन यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List